ETV Bharat / state

नंदुरबार : दहावी, बारावीची परीक्षा सुरू; नियमांचे पालन करूनच प्रवेश - ssc exam and lockdown nandurbar

परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे त्याचबरोबर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाऊ दिले जात आहे.

ssc and hsc exam start in nandurbar after lockdown
दहावी, बारावीची परीक्षा सुरू
author img

By

Published : Nov 20, 2020, 9:57 PM IST

नंदुरबार - लाॅकडाऊन आता जिल्ह्यात इयत्ता बारावी आणि दहावीची परीक्षा सुरू झाल्या आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे योग्य पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला. याप्रसंगी शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेट दिली.

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात चार परीक्षा केंद्रे आहेत. बारावीसाठी नंदुरबार शहर, शहाद्यात, नवापुरात आणि अक्कलकुवा येथे हे परीक्षा केंद्रे आहेत. त्यासाठी एकूण 1495 विद्यार्थी आहेत. तर दहावीसाठी दोन परीक्षा केंद्रे असून एकूण 747 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दहावीसाठी नंदुरबार आणि शहादा येथे हे परीक्षा केंद्र आहे.

शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम याबाबत प्रतिक्रिया देताना.
कोरोना नियमांचे पालन -

परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे त्याचबरोबर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाऊ दिले जात आहे.

हेही वाचा - पीएनबी बँक घोटाळ्यातील रुपयाचीही नाही वसुली; नीरव मोदीसह मेहुल चोक्सी मोकाट

मर्यादित बैठक व्यवस्था -

फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते शारीरिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा निम्मे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी केली पाहणी -

शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी परीक्षा केंद्रांना भेट दिली. त्या ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर परीक्षा केंद्रांना भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.