नंदुरबार - आता राज्यातील गरजु निराधार कुटुंबांनाही स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा पुरवठा होणार आहे. राज्यातील एपीएल आणि बीपीएल कुटुंबासोबतच विधवा, परितक्ता आणि गरजु, निराधार कुटुंबाना देखील स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा पुरवठा केला जाणार आहे. याबाबत राज्याचे नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजनेंच्या शुभारंभप्रसंगी नंदुरबारमध्ये त्यांनी ही घोषणा केली. पुढील दीड ते दोन महिन्यात प्रत्येक जिल्हाधिकाऱयाच्या सहाय्याने अशा कुटुंबाची छाननी केली जाणार आहे, त्यानुसार त्यांना स्वस्त धान्य दुकानातून रेशनच्या अन्न धान्याचा आधार देण्यात येणार असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले.