ETV Bharat / state

नंदुरबार: खरेदी केंद्रावरून यंदा 90 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी

author img

By

Published : Dec 24, 2020, 7:39 PM IST

Updated : Dec 24, 2020, 7:49 PM IST

यावर्षी एप्रिल ते जूनपर्यंत 75 हजार कापसाची खरेदी झाली होती. चालू हंगामात एक लाख 70 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.

कापूस खरेदी
कापूस खरेदी

नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या पळाशी येथील राजीव गांधी कापुस खरेदी केंद्रात सीसीआयमार्फत सुरू असलेली कापूस खरेदी तीन दिवस बंद असणार आहे. कापुस केंद्रावरील कापूस खरेदी 28 डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कापूस खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

मार्च महिन्यात टाळेबंदी झाल्यामुळे कापूस मार्केट समिती अंतर्गत सीसीआय कापुस खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. तोच कापूस जून व जुलै महिन्यात विक्रीसाठी बाजार समितीत आणण्यात आला आहे. यंदा कापूस खरेदी केंद्रावर गेल्या वर्षाच्या तुलनेने जास्त कापूस विक्री झाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. या हंगामामध्ये 95 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी एप्रिल ते जूनपर्यंत 75 हजार कापसाची खरेदी झाली होती. चालू हंगामात एक लाख 70 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.

यंदा 90 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी

हेही वाचा-खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक, काय आहे पुणे कनेक्शन?

यंदा भावामध्ये तफावत
गेल्या हंगामात कापसाला 5 हजार ते 5 हजार 400 पर्यंत भाव होता. त्याच्या तुलनेत यंदा 5 हजार 400 ते 5 हजार 700 पर्यंत सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्रातर्फे भाव देण्यात आला आहे.

हेही वाचा-पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

विषाणूजन्य रोगामुळे कापूस उत्पादनात घट
हंगामात गुलाबी बोंड आळी, लाल्या रोग यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

तीन दिवस कापूस खरेदी बंद
सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्र तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे. 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर कापूस खरेदी बंद राहणार आहे. बाजार समितीचे कामकाज पूर्ववत होईल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 24, 2020, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.