नंदुरबार - जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, शहादा येथील मध्यवर्ती बस स्थानकामधून बस सेवा सुरू न करता गावापासून दूर असलेल्या चालक प्रशिक्षण केंद्राच्या आवारातून शहादा आगाराच्या बसेस सोडल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बसने प्रवास करण्यासाठी शहादा शहरात आलेल्या नागरिकांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. यामुळे शहादा मध्यवर्ती बस स्थानकातून बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी सामजिक संघटनांनी केली आहे.
शहादा बस आगारातून नंदुरबार आणि धडगावसाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची थोड्या प्रमाणात सोय झाली आहे. मात्र, शहादा आगाराने ज्या ठिकाणाहून बस सेवा सुरु केली आहे त्याठिकाणी पोहचण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
नंदुरबार आणि जळगावसाठी बसेस सोडण्यात आलेल्या असल्याची माहितीदेखील नागरिकांना कळत नाही आहे. यामुळे नागरिकांना शहरापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर पायपीट केल्यानंतर नवीन बसस्थानक म्हणजेच चालक प्रशिक्षण केंद्रातून बसेस सुटतात त्याठिकाणी गेल्यावर नागरिकांना कळत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ही गैरसोय लवकरात लवकर थांबावी, यासाठी काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
तसेच मध्यवर्ती बस स्थानकातूनच ही सेवा सुरु करण्यात यावी, त्याचसोबत ग्रामीण भागात बस फेऱ्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही सामाजिक संघटनांनी केली आहे.
नंदुरबारमध्ये बससेवा सुरू; मात्र, नागरिकांना करावी लागतेय 4 ते 5 किमीपर्यंत पायपीट - shahada bus stand
नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, बसने प्रवास करण्यासाठी शहादा शहरात आलेल्या नागरिकांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. यामुळे शहादा मध्यवर्ती बस स्थानकातून बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी सामजिक संघटनांनी केली आहे.