नंदुरबार - जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात कोरोना लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज असल्याने लस टोचून घेण्यापासून दूर पळत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली आता शिक्षकांनी वेगवेगळ्या भूमिका घेऊन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. लसीकरणाची आकडेवारी वाढविण्यासाठी एका शिक्षकाने बहुरूप धारण करून जनजागृती केली तर वडाळी येथेच शिक्षकांनी लोककलेच्या माध्यमातून जनतेमध्ये लसीकरणाचे फायदे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली.
लसीकरणाच्या जनजागृतीसाठी शिक्षकांकडून विविध उपक्रम
ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत विविध गैरसमज पसरविण्यात आले आहेत. यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत आहेत. तिकडे शहरी भागात नागरिक उत्साहाने लसीकरण केंद्रावर जात आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात लसीकरणापासून नागरिक लांब जात आहेत. यासाठी शिक्षकांनी नागरिकांना समजेल त्या भाषेत लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत आणि यासाठी ते विविध उपाययोजना देखील राबवत आहेत.
होळी नृत्यातून केले नागरिकांना लसीकरणासाठी आकर्षित
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली आता शिक्षकांनी वेगवेगळ्या भूमिका घेऊन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहादा तालुक्यातील वडाळी गावात शिक्षकांनी आदिवासी होळी गेर नृत्याचे पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी ढोल वाजवत संस्कृतीचे दर्शन देत आदिवासी बांधवांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली. वडाळी येथील जीएस विद्या मंदिराचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्याचा दृष्टिकोन ठेवून आदिवासी वस्त्यांमध्ये बोलीभाषेतून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. प्रत्यक्ष आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत बोलीभाषेतून जनजागृतीबाबत नागरिकही लसीकरणासाठी पुढाकार घेत आहे. आदिवासी समाजात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षकांनी राबविलेले जनजागृती मोहीम लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील ठरत आहे.
हेही वाचा - डीआरडीओकडून कोरोनाच्या लढ्याकरिता औषध विकसित; डीजीसीआयकडून मंजुरी