ETV Bharat / state

जिल्ह्यात ७ हजार शिक्षकांची होणार कोरोना चाचणी; शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाची लगबग सुरू

मार्च २०२०पासून कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Jan 23, 2021, 10:07 AM IST

Corona Test
कोरोना चाचणी

नंदुरबार - २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर शिक्षकांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध ठिकाणी कोरोना चाचणी अहवाल केंद्र वाढवण्याचे आदेश मिळाले आहेत.

शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाची लगबग सुरू

सात हजार शिक्षकांची होणार चाचणी -

कोरोनामुळे मार्च २०२०पासून शाळा बंद आहेत. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू केल्या जात आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ७ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. शाळेची वेळ काय ठेवावी, एका वर्गात किती विद्यार्थी असावेत, याचे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समित्यांना शिक्षण विभागामार्फत शाळा सुरू करण्यापूर्वीचे नियोजन देण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

रुग्ण वाढीमुळे पालक चिंतीत -

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. यामुळे शाळांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावर नमुने गोळा केले जाणार आहेत. दरम्यान, शाळांनी वर्ग आणि बेंच निर्जंतुक करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील शाळांची आकडेवारी

  • जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या - १ लाख २६ हजार ७०२
  • एकूण शाळा - १ हजार ११४
  • एकूण शिक्षक - ७ हजार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.