ETV Bharat / state

कापूस खरेदीत ५ वर्षातील निचांक; हंगामात केवळ २२ हजार क्विंटल खरेदी - नंदूरबार

यंदाच्या वर्षी केवळ २२ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केंद्रातील ही मागील ५ वर्षातील सर्वात कमी आवक आहे.

बाजार समिती नंदूरबार
author img

By

Published : Feb 11, 2019, 8:39 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील बाजार समितीच्या खरेदी केंद्रात यंदाच्या वर्षी केवळ २२ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केंद्रातील ही मागील ५ वर्षातील सर्वात कमी आवक आहे. दरम्यान, आणखी किमान १५ दिवस दिवस कापूस खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम कापूस उत्पादनावर झाल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी कापूसला प्रतिक्विंटल ५,८०० रुपये इतका भाव मिळाला आहे.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे खरीपाच्या इतर सर्वच पिकांसोबत कापूस पिकालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सरासरी ९० हजार हेक्टर आहे. ही सरासरी गेल्या ५ वर्षापासून कमी कमी होत गेली आहे. एकुण खरीप क्षेत्राच्या ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर केवळ कापूस हेच पीक असते. मात्र, यंदाच्या वर्षी कापूस उत्पादनात घट पाहायला मिळाली.

यंदाच्या वर्षी अनियमित आणि अत्यल्प पजर्न्यमान यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. कापूस उत्पादन कमी झाले असले तरी भाव मात्र, अपेक्षीत मिळू शकला नाही. आता कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही भाव वाढ होत नसल्यामुळे साठवलेला कापूस शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री करावे लागत आहे.

undefined

Intro:नंदुरबार जिल्ह्यात कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असून बाजार समितीच्या खरेदी केंद्रात यंदाच्या हंगामात केवळ 22 हजार क्विंटल कापूस खरेदी केला गेला आहे. भाव देखील 5,800 पेक्षा अधीक जावू शकले नाहीत. गेल्या पाच वर्षातील यंदा सर्वात कमी आवक आहे. दरम्यान, आणखी किमान 15 दिवस कापूस खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे.Body:यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे खरीपाच्या इतर सर्वच पिकांसोबत कापूस पिकालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सरासरी 58 हजार हेक्टर असतांना गेल्या पाच वर्षापासून क्षेत्र तब्बल एक लाखाच्या आसपास जात आहे. एकुण खरीप क्षेत्राच्या 40 ते 45 टक्के क्षेत्रावर केवळ कापूस हेच पीक असते.

Conclusion:यंदा देखील जवळपास 90 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अनियमित आणि अत्यल्प पजर्न्यमान यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. कापूस उत्पादन कमी झाले तरी भाव मात्र अपेक्षीत मिळू शकला नाही. आता कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असतांनाही भाव वाढ होत नसल्यामुळे साठवलेला कापूस शेतक:यांना आहे त्या किंमतीत विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.