नांदेड - जिल्ह्यातील पार्डी म. येथील १०३ वयाच्या आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला. लक्ष्मीबाई महादू कांबळे असे त्या आजीबाईचे नाव आहे. नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत असून मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावात लक्ष्मीबाई कांबळे वास्तवाला आहेत. त्या १०३ वर्षांच्या असून त्यांनी आज लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या 'या' निर्णयाचे कौतुक परिसरात होत आहे. आज जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातही बऱ्यापैकी उत्साह पाहायला मिळाला.