ETV Bharat / state

माहूरगड देवस्थानात महिला पुजारी नेमण्याची तृप्ती देसाईंची मागणी - nanded renukamata news

साडे तीन शक्ती पीठांपैकी सर्व शक्ती पीठांत मंदिर ट्रस्टमध्ये ५० विश्वस्त महिला घेतल्या जाव्यात, तसेच पुजाऱ्यांमध्येदेखील जागा मिळावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

Trupti Desai
Trupti Desai
author img

By

Published : Jan 27, 2021, 7:25 PM IST

Updated : Jan 27, 2021, 7:44 PM IST

नांदेड - माहूरगड विश्वस्थांत महिलांना स्थान द्यावे तसेच मंदिरातदेखील महिला पुजारी नेमाव्यात, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. हा निर्णय लवकर घ्यावा, आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

'समानतेचा संदेश द्या'

साडे तीन शक्ती पीठांपैकी सर्व शक्ती पीठांत मंदिर ट्रस्टमध्ये ५० विश्वस्त महिला घेतल्या जाव्यात, तसेच पुजाऱ्यांमध्येदेखील जागा मिळावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून त्या नांदेड दौऱ्यावर आहेत. भोकर तालुक्यातील दिवशी येथील पीडित कुटुंबीयांची भेट त्यांनी घेतली. त्यानंतर माहूर गड येथे रेणुका मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिरात महिला पुजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

माहूरगड मंदिर ट्रस्टींची घेतली भेट

माहूर गडावरील रेणुका माता हीदेखील एक महिला आहे. मात्र तेथे पुरुष पुजारी पूजा करतात. पूजा करण्याचा अधिकार महिलांना का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. रेणुकामाता ट्रस्टमध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्यात याव्या आणि पुजाऱ्यांमध्ये देखील ५० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, तत्काळ हा निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

'बेटी बचाओ बेटी पढाओसोबतच बेटी संरक्षण'

एकीकडे बेटी बचाव बेटी पढाओ अभियान घेतले जात आहे. महिलांबाबतीत अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढे भूमाता ब्रिगेड बेटी बचाओ बेटी पाढाओ सोबतच बेटी संरक्षणासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'आंदोलनाची वाट पाहु नका'

महिलेला दुर्गा मातेचे रूप मानले जाते. मग त्यांचा आदरदेखील केला पाहिजे. याबाबतीत आंदोलनाची वाट पाहु नये, असा इशारा देसाई यांनी दिला.

मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत

भूमाता ब्रिगेड व युवराज ढमाले कॉर्प यांच्या संयुक्त विद्यामाने गरीब मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यात आली. सहा मुलींना धनादेश या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

Last Updated : Jan 27, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.