ETV Bharat / state

सोनिया गांधी यांच्या पत्रात काहीही वावगे नाही- अशोक चव्हाण - ashok chvhan news

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत नसल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
author img

By

Published : Dec 21, 2020, 8:28 PM IST

नांदेड - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात वावगे काही नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. हे सरकार बनवत असताना समान विकास कार्यक्रमावर बनले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पत्रात अंमलबजावणी व्हावी, ही अपेक्षा केली. त्यात काही वावगे नसल्याचे चव्हाण म्हणाले आहेत.

अशोक चव्हाण
मुंबई महापालिकेच्या निवडणूकी संदर्भात बैठक घेऊन निर्णय-मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर निर्णय प्रक्रीयेसाठी त्यांना प्रदेश काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पद देऊन त्यांचे पंख छाटल्याची चर्चा होत आहे. मात्र यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समन्वयासाठी हीच जुनी पद्धत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याची आपली तयारी असल्याचे काँग्रेसचे नूतन मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले. यावर आमची औपचारिक बैठक होईल, त्या नंतर याबाबतीत निर्णय होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

सोनिया गांधींचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेने एक वर्षापूर्वी गेले पंचवीस वर्षे आपला मित्र असलेल्या भाजपशी युती तोडली. ही युती तोडल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल असे सांगण्यात आले होते. मात्र तसे होत नसल्याने, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत नसल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर मतभेद

आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल, असे सत्ता स्थापन करण्यापूर्वी ठरवण्यात आले होते. मात्र सत्ता स्थापन झाल्यावर अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघडीच्या घटक पक्षांमध्ये वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लीम आक्षण! पहिल्या अधिवेशनातच कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. मात्र सेनेच्या मंत्र्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच निधीचे समान वाटप होत नसल्याची तक्रार देखील अनेक काँग्रेस आमदारांनी केली आहे

हेही वाचा- सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 'वर्षा'वर

हेही वाचा- BREAKING : राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.