ETV Bharat / state

धर्माबाद नगरपरिषदेत अपहार.. कर अधीक्षक आणि सफाई कामगाराला ४ दिवसांची पोलीस कोठडी - dharmabad

कर अधीक्षक आणि सफाई कामगार यांनी संगनमत करुन जागेचे भाडे, इमारत भाडे आणि सेवा शुल्क नागरिकांकडून वसुल करुन सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी परस्पर हडप केली.

धर्माबाद नगरपरिषद
author img

By

Published : Apr 28, 2019, 1:19 PM IST

नांदेड - धर्माबाद येथील नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक आणि सफाई कामगाराने संगनमताने १० लाख ५८ हजार ४९ रुपयांचा अपहार केल्यामुळे न्यायाधीश एन.आर. गजभिये यांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धर्माबाद नगरपरिषद

नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान आणि सफाई कामगार मनोज हरीसिंग टाक यांनी संगनमत करुन जागेचे भाडे, इमारत भाडे आणि सेवा शुल्क नागरिकांकडून वसुल करुन सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी परस्पर हडप केली.

सदर प्रकरणाची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कळताच त्यांनी लेखापरीक्षण करून घेतले. त्यात दोघेजण दोषी आढळले. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक रुकमाजी भोगावार यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांवर येथील पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला.

सदर अपहार प्रकरण मोठे आहे. यामध्ये अनेक मोठी नावे अडकण्याची शक्यता तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरकंडे वर्तविली आहे. तसेच तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान यांनी अनेकांकडून गाळे भाडे वसूल केले आहे. परंतु, सदर व्यापाऱयांना नगरपरिषदेची पोचपावती दिली नसल्याची चर्चा शहरातील व्यापारी करत आहेत.

Intro:नांदेड - धर्माबाद पालिकेतील अपहार, दोघांना पोलीस कोठडी.

- अपहार प्रकणात बडे मासे अडकण्याची शक्यता.

नांदेड : धर्माबाद येथील नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक व सफाई कामगाराने संगनमत करुन
१० लाख ५८ हजार ४९ रुपयांचा अपहार केल्यामुळे त्यांना येथील न्यायाधीश एन.आर.गजभिये यांनी
चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.Body:
येथील नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान व सफाई कामगार मनोज हरीसिंग टाक यांनी संगनमत करून जागेचे भाडे, इमारत भाडे व सेवा शुल्क नागरिकांकडून वसुल करून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा
करण्याऐवजी परस्पर हडप करून मौजमजा केली. सदर प्रकरणाची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे
याना कळताच त्यानी लेखापरीक्षण करून घेतले.त्यात दोघे दोषी आढळून आल्यामुळे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक रूकमाजी भोगावार यांनी पोलिसांत दिलेल्या
फिर्यादीवरून दोघाजणांवर येथील पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.Conclusion:वरील दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एन.आर. गजभिये यांनी दि.३० एप्रिलपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर
अपहार प्रकरण मोठे असून यात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता तपास अधिकारी तथा
उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरकंडे वर्तविली आहे. तसेच तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान
नवाजखान यांनी अनेकांकडून गाळे भाडे वसूल केले आहे. परंतु सदर व्यापा-यांना नगरपरिषदेची पोचपावती दिली नसल्याची चर्चा शहरातील व्यापारी करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.