नांदेड - सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत, ईपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई आणि जिल्हा रूग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने इपिलेप्सी (फेफरे/फिट्स/आकडी) शिबिराचे आयोजन 10 फेब्रुवारीला करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर, व वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ऐ. पी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
शिबिरात तज्ञ न्युरोलॉंजिस्ट डॉ. निर्मल सूर्या व त्यांची टीम यांच्यामार्फत एकूण ३८७ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ रुग्णांची ईईजी चाचणी, २८ रुग्णांची फिजीओथेरपी, २० रुग्णांची स्पीच थेरपी व २८ रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. रुग्णांना या उपचार पद्धतीसह औषधांचा मोफत लाभ देण्यात आला.
या शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एन. हजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. शिरसीकर, डॉ. लोकडे, डॉ. माने, डॉ कुलदीपक, डॉ. सोनकांबळे, यांनी ईपिलेप्सी फाऊडेशन टीमच्या तज्ञ डॉक्टरांशी समन्वय साधून शिबिराचे नियोजन केले.
प्रभारी अधीसेविका एस. एस. चरडे, परिसेविका एस. बी. राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, अर्थसंकल्पीय व वित्त अधिकारी दत्ता सवादे, व समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.