ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

author img

By

Published : Feb 5, 2021, 8:02 PM IST

पेट्रोल दरवाढीचा विरोध करत शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढला. महात्मा फुले चौकातून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

नांदेड शिवसेना बैलगाडी मोर्चा न्यूज
नांदेड शिवसेना बैलगाडी मोर्चा न्यूज

नांदेड - पेट्रोल दरवाढीचा विरोध करत शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढला. महात्मा फुले चौकातून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

नांदेड शिवसेना बैलगाडी मोर्चा न्यूज
नांदेड : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

हेही वाचा - पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात जिल्ह्यात शिवसेनेचे आंदोलन

नांदेडात पेट्रोल ९५.४४ रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. पेट्रोलचे दर कमी होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस या दरांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड राग असल्याचे या मोर्चातून दिसून आले.

सेनेने काढला बैल गाडी मोर्चा

कोरोनासारख्या महामारीतून सामान्य नागरिक अजून बाहेर आले नाहीत. रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांच्या या संतापाला वाट मोकळी करून देत शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.

हेही वाचा - वीज वितरण कंपनीविरोधात बीडमध्ये भाजपचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.