नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०१९ च्या परीक्षा दि. २७ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झाल्या आहेत. दि. २ ते ७ डिसेंबर दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमापैकी एम.ए. (सर्व विषय), एम.कॉम., एम.एस्सी.(सर्व विषय), एम.कॉम.(यु.जी.सी.), एम.एस.डब्ल्यू., एम.लिब.(जुना आणि नवीन), एम.जे.(जुना आणि नवीन), तसेच एम.सी.ए., एम.एस्सी.(सी.एम.), एम.एस्सी.(सॅन) या अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; ४८ तासांमध्ये आरोपी ताब्यात..
या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दि. २ डिसेंबर रोजी होणारे पेपर आत्ता ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याप्रमाणेच ३ डिसेंबरचे १० डिसेंबरला, ४ डिसेंबरचे ११ डिसेंबरला, ५ डिसेंबरचे १२ डिसेंबरला, ६ डिसेंबरचे १३ डिसेंबरला तर ७ डिसेंबर रोजीचे पेपर १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. तसेच एम.सी.ए., एम.एस्सी.(सी.एम.), एम.एस्सी.(सॅन) या अभ्यासक्रमाच्या यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि.९ डिसेंबर २०१९ रोजीच्या परीक्षा ह्या दि.१६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा - पवारांचा डाव अन् साताऱ्याच्या दोन आमदारांवर घाव
तर एम.बी.ए. या अभ्यासक्रमाच्या ९ ते १४ डिसेंबर रोजीचे सर्व पेपर यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत आणि २ डिसेंबर रोजीचे पेपर १६ डिसेंबर रोजी, ३ डिसेंबरचे १७ डिसेंबरला, ४ डिसेंबरचे १८ डिसेंबरला, ५ डिसेंबरचे १९ डिसेंबरला, ६ डिसेंबरचे २० डिसेंबरला तर ७ डिसेंबर रोजीचे पेपर २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुधारित तारखेप्रमाणे वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये संपन्न होणार आहे. याची संबंधित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इतर सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे यांनी कळविले आहे.