ETV Bharat / state

Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी केली जप्त - संजय बियाणी हत्या प्रकरण अपडेट

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या (Sanjay Biyani Murder Case) करण्यात आली होती. या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली व कुंटूर शिवारात जाळलेली पल्सर दुचाकी निष्पन्न झाली असून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

sanjay biyani
संजय बियाणी
author img

By

Published : Jun 9, 2022, 8:15 PM IST

नांदेड - येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या (Sanjay Biyani Murder Case) करण्यात आली होती. याप्रकरणात आत्तापर्यंत ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली व कुंटूर शिवारात जाळलेली पल्सर दुचाकी निष्पन्न झाली असून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ९ आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवार (दि.१०) संपणार असून पुढील पोलीस कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. येत्या दोन दिवसात या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोघांना अटक करणार असल्याची माहिती एस‌आयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि निलेश मोरे यांनी सांगितली.

नांदेड शहरातील शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तब्बल ५५ दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा करता आला. सहा राज्यात तपास तसेच तीन देशात पत्रव्यवहार करून या तपासाची कडी जोडण्यात आली. सर्वप्रथम सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत पाठवले. एकूण नऊ आरोपींची पोलिस कोठडी १० जून रोजी संपणार आहे.

पोलीस कोठडी तपासादरम्यान हल्लेखोरांनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी ही कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तीच दुचाकी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लवकरच दोन आरोपी पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक करण्यात येईल असे विजय कबाडे यांनी सांगितले. खंडणी आणि दहशत याच कारणावरून संजय बियाणी यांची कुख्यात हरविंदरसिंग उर्फ रिंदा संधू याच्या सांगण्यावरूनच त्याच्या सहकार्‍यांकडून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.