ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक घाबरले - नाना पटोले - Former Lok Sabha Speaker of BJP Sumitra Mahajan

भारत जोडो यात्रेला प्रतिसाद ( Bharat Jodo Yatra response ) मिळत असल्याने विरोधक घाबरले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केली आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra
author img

By

Published : Nov 13, 2022, 9:58 PM IST

नांदेड - भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) ही जनयात्रा झाली आहे. राजकारणा व्यतीरिक्तचे लोक यात सहभागी ( Bharat Jodo Yatra response ) होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपच्या माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन ( Former Lok Sabha Speaker of BJP Sumitra Mahajan ) यांनी भारत जोडो यात्रेचे समर्थन केले आहे. त्याच पक्षाचे लोक नौटंकी म्हणतात. त्यांचे पितळ उघडे पडले आहे. सत्तेतून बाहेर जावे लागणार, अशी भिती निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी नांदेड येथे केली.

देशात यात्रेमुळे परिर्वतन - भारत जोडो यात्रेचा चार दिवस नांदेड जिल्हयात मुक्काम होती. सध्या यात्रा हिंगोली जिल्हयात असून या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने रविवारी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्कारराव पाटील खतगावकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, जीएसटी या प्रश्नावर लोक पेटून उठले आहेत. महाराष्ट्रातच नव्हेतर देशात यात्रेमुळे परिर्वतन होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. तसेच या यात्रेमुळे कार्यकर्ते कामाला लागले असून जिददीला पेटले आहेत. यात्रे नंतर पुन्हा जोरात कामाला लागणार आहेत, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

एक एक प्रकल्प इतर राज्यात - राज्यातून एक एक प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडत आहेत. या सरकरमधील अनेक मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही होते. 'नाचता येईना अंगण वाकडे', असे आहे. महाराष्ट्रात काय चालले आहे?, हे ईडी सरकारचे फेलील्युअर आहे. आपले पाप दुस-यांवर फोडत आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनी नेत्यांच्या मुलांचे लॉचिंगसाठी यात्र, अशी टीका केली. यावर पटोले म्हणाले, त्यांच्य वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते काहीही बोलत आहेत. मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले, मोदींना व्यक्तीगत काहीच बोलायचे नाही. त्यांच्या कर्तुत्वावर आम्ही बोलतो. पावला पावलावर तुम्ही लोकांना तोडत आहात. त्यामुळे मोदींनी आपल्या अंगावर घेऊ नये, असे पटोले यांनी सांगितले.

दोन्ही मुली स्वत: हून भारत जोडो यात्रेत सहभागी - यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Former Chief Minister Ashok Chavan ) म्हणाले, प्रत्येक पित्याला आपल्या मुलांनी पुढे यावे असे वाटते. श्रीजया व सुजया या माझया दोन्ही मुली स्वत: हून भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. माझया भावना मी त्याच दिवशी व्यक्त केल्या आहेत. त्यांना राहुल गांधी यांचे विचार आवडले आहेत. त्या काश्मिरपर्यंत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्या आजुन पूर्णपणे राजकारणात उतरल्या नसून त्या उतरतील कि नाही? हे सांगता येणार नाही. ही सर्वस्वी त्यांची इच्छा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.