नांदेड - तृतीयपंथी मतदारांची संख्या जिल्ह्यात वाढली असून, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २१ तृतीयपंथी मतदार होते. मात्र, यंदाच्या विधानसभेला ही संख्या ७९ झाली आहे. २०१४ च्या तुलनेत यावर्षी ५८ तृतीयपंथी मतदार वाढले आहेत.
२०१४ मध्ये लोहा, देगलूर मतदारसंघात कोणत्याही तृतीयपंथी मतदारांची नोंद नव्हती. परंतु, यंदा लोहामध्ये ५ व देगलूरमध्ये ४ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. नांदेड दक्षिण या एकमेव मतदार संघात एकाही तृतीयपंथी मतदाराची अद्याप नोंद झालेली नसून, नांदेड उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ४५ मतदारांची नोंदणी झाली आहे.
हेही वाचा स्वतंत्र स्मशानभूमीसाठी नांदेडात तृतीयपंथीयांचे महापालिकेसमोर आंदोलन
जिल्ह्यात मतदार नोंदणीची प्रकिया प्रशासनाने मोठ्या प्रमाणात राबवल्याने मतदार नोंदणीत सर्वांनीच उत्साह दाखवल्याचे चित्र आहे.