ETV Bharat / state

दोन लाखांची लाच ! महसूल उपविभागीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले - अमोलसिंह भोसले

नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे

महसूल उपविभाग अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
author img

By

Published : Sep 3, 2019, 10:09 AM IST

नांदेड - महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रविवारी रात्री रंगेहात पकडले आहे. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकना सोडून देण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा... माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज लंपास

अमोलसिंह भोसले यांच्याविरोधात ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे ट्रक जप्त केले होते. हे ट्रक सोडवायचे असतील तर लाच द्यावी लागेल, असे दोन मध्यस्थांनी तक्रारदाराला सांगितले. श्यामकुमार साईबाबू गोणगे (रा. निझामाबाद) आणि श्रीनिवास सत्यनारायणा जिनकला (रा. मिरयालगुडा) अशी या दोन मध्यस्थांची नावे आहे. या दोघांनी उपविभागीय अधिकाऱ्याला लाच मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करुन सहकार्य केले होते. भोसले सारख्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... पाच लाखांसाठी विवाहितेला जिवंत जाळले

महसूल विभागीय आयुक्त कार्यालय रेतीच्या अवैध धंद्यांबाबतची सर्वंकष चौकशी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सुरू आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी हे चौकशी अहवाल तयार करणार आहेत. सध्या या अहवालामधील ' दोषींविरुध्द कशा पध्दतीने कारवाई करावी ' याचे लेखन सुरू आहे. एकीकडे हा अहवाल बनवला जात असताना दुसरीकडे याच विभागाचा अधिकारी लाच घेताना पकडण्यात आला आहे.

हेही वाचा... मुंबईनाका पोलिसांकडून ६ लाखांचा गुटखा जप्त​​​​​​​

Intro:महसूलचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना दोन लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले....!

नांदेड: महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रविवारी रात्री रंगेहात पकडले आहे. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकना सोडून देण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे . Body:महसूलचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना दोन लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले....!

नांदेड: महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रविवारी रात्री रंगेहात पकडले आहे. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकना सोडून देण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे .

भोसले यांच्याविरोधात ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे हायवा ट्रक जप्त केले होते . हे ट्रक सोडवायचे असतील तर लाच द्यावी लागेल असे दोन मध्यस्थांनी तक्रारदाराला सांगितले. श्यामकुमार साईबाबू गोणगे ( रा . निझामाबाद ) आणि श्रीनिवास सत्यनारायणा जिनकला ( मिरयालगुडा ) अशी या दोन मध्यस्थांची नावे आहे. या दोघांनी उपविभागीय अधिकाऱ्याला लाच मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करुन सहकार्य केले होते. या कारवाईला यासाठी महत्व आहे कारण महसूल विभागीय आयुक्त कार्यालय रेतीच्या अवैध धंद्यांबाबतची सर्वंकष चौकशी संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे . अतिरिक्त जिल्हाधिकारी हे चौकशी अहवाल तयार करणार आहेत. सध्या या अहवालामधील ' दोषींविरुध्द कशा पध्दतीने कारवाई करावी ' याचे लेखन सुरू आहे . एकीकडे हा अहवाल बनवला जात असताना दुसरीकडे याच विभागाचा अधिकारी लाच घेताना पकडण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.