ETV Bharat / state

Nanded Crime News: गीट्टी क्रेशर मालकाकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक; सापळा लावून आरोपी जेरबंद

गीट्टी क्रेशर मालकाकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना सोनखेड पोलीस ठाणे क्षेत्रातील ढाकणी येथे गुरूवारी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली. पुढील तपास पोलीस करत आहे.

Nanded Crime News
आरोपींना अटक
author img

By

Published : Jun 30, 2023, 10:35 AM IST

खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक

नांदेड : ढाकणी येथे असलेल्या गिट्टी क्रेशर मालकाकडे तीन आरोपींनी ५० लाख रूपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गोळीने उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती. मागील एक महिन्यांपासून खंडणीसाठी आरोपींचा पाठपुरावा सुरू होता. गुरूवारी क्रेशर मालकाने पैसे देण्याचे कबूल केल्यानंतर तीन आरोपी दुचाकीवरून ढाकणी येथे आले होते. परंतु, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.

'अशी' घडली घटना : एका कंत्राटदाराकडे ५० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलीसांनी सापळा लावला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धाकणी गावाजवळ ही घटना घडली. नांदेडमधील कंत्राटदार तेजस लोहिया यांना फोन करुन आरोपांनी एक कोटीची खंडनी मागीतली. आम्ही कुख्यात गुंड असल्याची धमकी दिली. तेजस लोहिया यांनी पोलिसांना ही माहिती दिली. आरोपीशी बोलून दोन लाख देण्याचे ठरवण्यात आले.

सापळा लावून पकडले आरोपींना : पोलीसांनी सापळा लावला. पैसे घेण्यासाठी तीन आरोपी कार आणि दोन दुचाकीवरुन आले. पोलिसांना बघताच आरोपींनी गोळीबार केला, प्रतीउत्तरात पोलीसांनी गोळीबार केला. यात कोणालाही दुःखपत झाली नाही. पाठलाग करून पोलीसानी तिघांना अटक केली. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोळीबार केला : यादरम्यान काही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला असल्याची माहिती आहे. घटनास्थळी गुरूवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सोनखेडचे सह पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जात नसली तरी संपूर्ण तपासानंतर माहिती दिली जाईल. असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. आरोपींनी खंडणी मागताना कुख्यात दहशतवादी 'हरविंदरसिंघ रिंदा' याचे नाव घेतले असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या घटनेचा पोलीस विभागाकडून कसून तपास सुरूआहे

हेही वाचा :

  1. Chandrapur Crime News : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले
  2. Firing In Morena : चंबळमध्ये पुन्हा गोळीबार, जमिनीच्या वादातून झालेल्या फायरिंगमध्ये 6 ठार, पाहा व्हिडिओ
  3. Mumbai Crime : बाप-लेकाने मिळून महिलेवर झाडल्या धडाधड गोळ्या; दोघेही फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.