नांदेड - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची घोषणा नुकतीच केली. अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सदस्यांमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, पत्रकार संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर....
शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील अडीअडचणीची आपणास चांगलीच जाणीव असून आपल्या व शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना योग्य ते औषधोपचार व चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या मंडळावर आपली नियुक्ती केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना आपण मनातून धन्यवाद देतो, असे उद्गार आमदार मोहन हंबर्डे यांनी काढले.
रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभ्यागत मंडळाची स्थापना....
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न असलेल्या रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात येते. शासनाने या मंडळाची नुकतीच पुर्नरचना करून अध्यक्षपदी हंबर्डे यांची नेमणूक केली. सदस्य म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार बालाजीराव कल्याणकर, पत्रकार संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ, डॉ.करूणा जमदाडे, श्रीमती कल्पना शिरपुरे, दिगांबर पवार, रोहिदास जाधव, कैलास धोत्रे, डॉ. दि. बा. जोशी यांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्त केल्याबद्दल अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला