ETV Bharat / state

तृतीयपंथीयांसाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देणार - न्या. राजेंद्र रोटे - nanded

जिल्हा न्यायालय परिसरातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या कार्यालयात आज तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

transgender meet nanded
तुतीयपंथीय बैठक
author img

By

Published : Feb 19, 2020, 10:19 AM IST

नांदेड - आयुष्यभर जगण्याच्या खस्ता खाणाऱ्या तृतीयपंथीयांना त्यांच्या मृत्यूनंतरही स्मशानभूमी मिळत नाही. त्यामुळे, तृतीयपंथीयांच्या अंत्यविधीचा प्रश्न गंभीर ठरत असतो. याबाबत शहर व जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी दिला आहे.

माहिती देताना न्या. रांजेंद्र रोटे आणि तृतीयपंथी

जिल्हा न्यायालय परिसरातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या कार्यालयात आज तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण नांदेड सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत न्यायमूर्ती रोटे यांनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या जाणून घेतल्यानंतर स्मशानभूमीचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याबाबत त्यांना आश्वासित केले.

शहर व जिल्ह्यात जवळजवळ ३०० हून अधिक तृतीयपंथी आहेत. आयुष्यभर असंख्य प्रश्नांचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीयांचे जीवन वेदना आणि समस्यांनी भरलेले आहे. ना कुटुंब, ना नातेवाईक, ना जिव्हाळ्याची माणसे असे संघर्षमय जीवन जगणाऱ्या तृतीय पंथींच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारीही नसतात. अशा परिस्थितीत तृतीयपंथीयांच्या सामाजिक जीवनातील असंख्य प्रश्न जाणून घेतल्यानंतर तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी लावून धरला.

जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी समशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शहरातील तहसीलदारांशी आपण त्वरित चर्चा करू. त्या अनुषंगाने तृतीयपंथीयांना लवकरात लवकर स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्‍वास न्यायमूर्ती राजेंद्र रोटे यांनी तृतीयपंथीयांना दिला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अॅड. नय्युमखान पठाण, अॅड. सुभाष भेंडे यांच्यासह कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधने, तृतीयपंथीयांचे गुरू गौरी शनूर बकश, अर्चना शानूर बकश, स्मिता शानूर बकश, जय शानूर बकश, दीपा जया बकश, मुस्कान जया बकश, वर्षां बकश, नानू बकश, सनम जया बकश आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा- मांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.