ETV Bharat / state

कट्टर मित्र बनले प्रतिस्पर्धी! नांदेडमध्ये 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव'

एकेकाळचे कट्टर मित्र आणि कट्टर राजकीय विरोधक असणारे 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव' असा सामना होणार आहे.

अशोक चव्हाण विरोध प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात रंगणार लढत
author img

By

Published : Mar 24, 2019, 11:12 AM IST

नांदेड - भाजपने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या २ दिवसात प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर केले. हे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात विविध निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या या दोघात सामना झाला. पण पहिल्यांदाच एकेकाळचे कट्टर मित्र आणि कट्टर राजकीय विरोधक असणारे 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव' असा सामना होणार आहे.

नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांनी आत्तापर्यत सर्व डाव परतवून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अशोक चव्हाण यांना 'चेक' देण्यात भाजपा यशस्वी होईल का? याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार अमिता चव्हाण ह्या एकमेव दावेदार होत्या. पण राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन काँग्रेसच्या उमेदवारी बाबतही आता संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भाजपच्या उमेदवारीवर काँग्रेसचे गणित ठरणारे होते. तर दुसरीकडे भाजपमध्येही काँग्रेसकडून खुद्द अशोक चव्हाण उमेदवार राहिल्यास त्यास तोडीस-तोड म्हणून तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत होते.

त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र होते. पण शुक्रवारी रात्री भाजपाने घोषित केलेल्या यादीत प्रताप पाटील-चिखलीकर यांची उमेदवारी घोषित झाली. तर शनिवारी रात्रीच्या यादीत काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. दोन्हीकडून मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीला आता चांगलाच रंग आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडचा काँगेसचा किल्ला चव्हाण यांनी शाबूत ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य इकडे वेधले होते. गेल्या अनेक निवडणुकीत भाजपने चव्हाण यांच्या किल्ल्याला भेदण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विरोधकांना परतवून लावले.

यापूर्वीही आमदार प्रताप पाटील-चिखलीकर हे शिवसेनेत असतानाही त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन महानगरपालिका निवडणुकीत चव्हाण विरोधात रणशिंग फुंकले होते. पण अपेक्षित असे यश मिळाले नव्हते. तर दुसरीकडे चव्हाण तसेच महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे आमदार अमिता चव्हाण यांचे नाव पुढे केले होते. जिल्ह्यातून एकमेव त्यांच्या नावाचा ठरावही राज्य कार्यकारिणीला पाठविण्यात आला होता.

पण जसजशी परिस्थिती बदलत खासदार अशोक चव्हाण यांनी 'कदाचित' मीही उमेदवार असू शकतो. म्हणून बदलती राजकीय परिस्थिती लक्ष्यात घेऊन ही गुगली टाकली होती. राजकारणात दुधासह ताक ही फुंकून पिणारे अशोक चव्हाण 'रिस्क' कधीच घेत नाहीत. त्यामुळे बदलती राजकीय परिस्थिती घेऊन स्वतःच मैदानात उतरले होते. 'अभी नही तो कभी नही' म्हणत भाजपनेही हार न मानता पक्षाच्यावतीने सूक्ष्म असे नियोजन सुरू केले आहे. गेल्या ४ दिवसांपासून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ठाण मांडून आहेत. प्रत्यक्षपणे बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेत आहेत.

कट्टर मित्र ते प्रतिस्पर्धी -
देश व राज्य पातळीवरून पुन्हा खासदार चव्हाण यांना घेरून नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल. याची आखणी सुरू केली आहे. त्यासाठी खुद्द अशोक चव्हाण उमेदवार असल्यामुळे तेवढाच तोडीचा उमेदवार देण्यासाठी रणनीती आखली आहे. भाजपकडून खासदार चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांचे नाव राज्यस्तरावरून पुढे केले आहे. एकेकाळचे कट्टर मित्र असणारे आता कट्टर राजकीय विरोधक असणारे अशोक व प्रताप यांच्यात पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे सामना होणार आहे. यामुळे राज्याचे संपूर्ण लक्ष लागले आहे.

Intro:नांदेडमध्ये 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव'...;
पहिल्यांदाच होणार समोरासमोरची लढाई..Body:नांदेडमध्ये 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव'...;
पहिल्यांदाच होणार समोरासमोरची लढाई....!

नांदेड: उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात भाजपाने प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर झाले.हे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे नाव घोषित झाले आहे. जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात विविध निवडणुकीत अप्रत्यक्ष दोघात सामना झाला. पण पहिल्यांदाच एकेकाळचे कट्टर मित्र आणि कट्टर राजकीय विरोधक असणारे 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव' असा सामना होणार आहे. नांदेडच्या राजकारणात अशोकरावानी सर्व डाव परतवून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या या सारीपाटात अशोकराव यांना 'चेक' देण्यात नेमकी भाजपा किती यशस्वी होईल का? याकडे राज्यासह देशाचे लक्ष्य वेधणारे आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या आ.अमिता चव्हाण ह्या एकमेव दावेदार होत्या. पण राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन काँग्रेसच्या उमेदवारी बाबतही आता संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भाजपच्या उमेदवारीवर काँग्रेसचे गणित ठरणारे होते. तर दुसरीकडे भाजपामध्येही काँग्रेसकडून खुद्द अशोकराव चव्हाण उमेदवार राहिल्यास त्यास तोडीस-तोड म्हणून तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असल्याचे चित्र होते. पण शुक्रवारी रात्री भाजपाने घोषित केलेल्या यादीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी घोषित झाली. तर शनिवारी रात्रीच्या यादीत काँग्रेसकडून खा.अशोकराव चव्हाण यांचे नाव घोषित झाला आहे. दोन्हीकडून मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीला आता चांगलाच रंग भरणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही नांदेडचा काँगेसचा किल्ला खा.अशोक चव्हाण यांनी शाबूत ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य इकडे वेधले होते. गेल्या अनेक निवडणूकीत भाजपने खा.अशोकराव चव्हाण यांच्या किल्ल्याला भेदण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विरोधकांना परतवून लावले. यापूर्वीही आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे शिवसेनेत असतानाही त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेऊन महानगरपालिका निवडणुकीत चव्हाण विरोधात रणशिंग फुंकले होते.पण अपेक्षित असे यश मिळाले नव्हते. तर दुसरीकडे खा.चव्हाण तसेच महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे आ.अमिता चव्हाण यांचे नाव पुढे केले होते. जिल्ह्यातून एकमेव त्यांच्या नावाचा ठरावही राज्य कार्यकारिणीला पाठविण्यात आला होता.
पण जसजशी परिस्थिती बदलत खा.अशोक चव्हाण यांनी 'कदाचित' मीही उमेदवार असू शकतो. म्हणून बदलती राजकीय परिस्थिती लक्ष्यात घेऊन ही गुगली टाकली होती. राजकारणात दुधासह ताक ही फुंकून पिणारे अशोकराव चव्हाण 'रिस्क' कधीच घेत नाहीत. त्यामुळे बदलती राजकीय परिस्थिती घेऊन स्वतःच मैदानात उतरले होते.
'अभी नही तो कभी नही' म्हणत भाजपानेही हार न मानता पक्षाच्या वतीने सूक्ष्म असे नियोजन सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ठाण मांडून आहेत. प्रत्यक्षपणे बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेत आहेत. देश व राज्य पातळीवरून पुन्हा खा.चव्हाण यांना घेरून नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाचा उमेदवार कसा निवडून येईल. याची आखणी सुरू केली आहे. त्यासाठी खुद्द अशोक चव्हाण उमेदवार असल्यामुळे तेवढाच तोडीचा उमेदवार देण्यासाठी रणनीती आखली आहे. भाजपाकडून खा.चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव राज्यस्तरावरून पुढे केले आहे. एकेकाळचे कट्टर मित्र असणारे आता कट्टर राजकीय विरोधक असणारे अशोकराव व प्रतापराव यांच्यात पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे सामना होणार आहे. ही लढाईकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष्य राहणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.