नांदेड - बोअरवेलमध्ये चक्क लाव्हासदृश्य पदार्थ निघाल्याने जांबरून गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बोअरवेलमधून निघणारा लाव्हासदृश्य पदार्थ पाहण्यासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली.
जांबरून गावातील तुकाराम देशमुख यांच्या शेतात काही दिवसापूर्वी बोअरवेल घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी बोअरवेलला पाणी लागले नव्हते. पण, आता मात्र या कोरड्या बोअरवेलमधून चक्क लाव्हासदृश्य पदार्थ निघत असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. बोअरवेलमधून निघणारा लाव्हासदृश्य पदार्थ हा खरच लाव्हा आहे की, अजून काही हे जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतरच समोर येईल. दरम्यान, बोअरवेलमधून निघणारा लाव्हासदृश्य पदार्थ पाहण्यासाठी गावातील लोक तुकाराम देशमुख यांच्या शेतात मोठी गर्दी करत आहेत.