नांदेड - दारूसाठी पैसे न दिल्याने एकाच्या अंगावर उकळते तेल टाकल्याची घटना लोहा शहरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा शहरातील पालम मार्गावरील शिवाजी चौकात ही घटना घडली.
लोहा शहरातील पालम मार्गावरील शिवाजी चौकात राहुल जाधव यांच्या वडापाव गाड्यावर आरोपी विजय कांबळे (इंदिरानगर लोहा) हा काल (बुधुवार) दुपारी दीड वाजता गेला. आरोपी विजयने राहुलला दारू पिण्यास 100 रुपये मागितले. त्याने नकार दिला असता विजयने शिवीगाळ करून वडापावच्या गाड्यावरील कढईत असलेले उकळते तेल राहुलच्या अंगावर टाकले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यामध्ये राहुलला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत राहुलने दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुरनं ६६/२०२० कलम ३२६,५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.