ETV Bharat / state

म्हाडाच्या गाळयासाठी जिवंत महिलेला दाखवले मृत; 6 जणांविरुद्ध गुन्हा

author img

By

Published : May 11, 2019, 2:23 PM IST

जिवंत महिलेला मृत दाखवून तिचा म्हाडातील गाळा आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड येथे उघड झाला आहे

शिवाजी नगर पोलीस ठाणे

नांदेड - जिवंत महिलेला मृत दाखवून तिचा म्हाडातील गाळा आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड येथे उघड झाला आहे. या प्रकरणी सहाहून अधिक जणांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाणे

शहरातील गोकुळनगरमधील रहिवासी व सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मीबाई रामलू अनंता (वय ६५ वर्षे) या महिलेचे पती रामलू यांच्या नावे शहरातील लेबर कॉलनीमधील म्हाडा गाळा क्रमांक २१/२८६ हा आहे. परंतु, शहरातील रहिवासी शंकर शिंगे, सुजाता शंकर, कपिल शंकर, प्रियंका शंकर, कोमल आनंद जाधव, मोहम्मद आमेर अब्दुल रशीद व म्हाडा कार्यालय नांदेडमधील अधिकारी, कर्मचारी व म्हाडाच्या औरंगाबाद कार्यालयातील नाव परिवर्तन करणारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन फिर्यादी लक्ष्मीबाई यांच्या पतीच्या नावे असलेला म्हाडाचा गाळा परिवर्तन करण्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन नाव परिवर्तन करुन घेतले.

हा सर्व प्रकार दि. १५ ऑक्टोबर २०११ ते २३ मे २०१६ च्या दरम्यान आरोपींनी केला. फिर्यादी जिवंत असतानाही पालिकेकडून मृत्यू प्रमाणपत्र काढून कोणीही वारस जिवंत नाही, असे खोटे कागदपत्र तयार केले. आर्थिक लाभापोटी फसवणूक केली. याबाबत लक्ष्मीबाई रामलू अनंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी कलम ४२०, २६४, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करीत आहेत.

Intro:नांदेड - म्हाडाच्या गाळयात फसवणूक; 6 जणांविरुद्ध गुन्हा.

नांदेड : जिवंत महिलेला मृत दाखवून तिचा म्हाडातील
गाळा आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी सहाहून अधिक जणांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:
शहरातील गोकुळनगरमधील रहिवासी व सेवानिवृत्त
कर्मचारी लक्ष्मीबाई रामलू अनंता-६५ या महिलेचा पती रामलू यांच्या नावे शहरातील लेबर कॉलनीमधील म्हाडा गाळा क्रमांक २१/२८६ हा आहे. परंतु शहरातील रहिवासी शंकर शिंगे, सुजाता शंकर,कपिल शंकर,प्रियंका शंकर,कोमल आनंद जाधव, मोहम्मद आमेर अब्दुल रशीद व म्हाडा कार्यालय नांदेडमधील अधिकारी, कर्मचारी व म्हाडाच्या औरंगाबाद कार्यालयातील नाव परिवर्तन करणारे संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन फिर्यादी लक्ष्मीबाई हिच्या पतीच्या नावे असलेला म्हाडाचा उपरोक्त गाळा परिवर्तन करण्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन नाव परिवर्तन करुन घेतले.Conclusion:
हा सारा प्रकार दि. १५.१०.२०११ ते द.२३.०५.२०१६
च्या दरम्यान आरोपींनी केला. फियादी जिवंत असतानाही मनपाकडून मृत्यू प्रमाणपत्र काढून कोणीही वारस जिवंत नाही असे खोटे कागदपत्र तयार करुन आर्थिक लाभापोटी फसवणूक केली. याबाबत लक्ष्मीबाई भ्र.रामल अनंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुरन
१६४/२०१९ कलम ४२०, २६४, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.