ETV Bharat / state

नांदेडमध्ये तोतया पोलिसांडून नागरिकांना मारहाण, गुन्हा दाखल

तोतया पोलिसांनी आदमपूर व परिसरातील अनेक गावांमध्येही ५ एप्रिल रोजी असाच धुमाकूळ घातला. सरपंच व पोलीस पाटील यांना समजल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना हे चारही तोतया पोलीस पुन्हा याच भागात आले. त्यांनी पुन्हा ग्रामस्थ, दुकानदार व शेतकऱ्यांना मारहाण सुरू केली.

nanded
नांदेडमध्ये तोतया पोलिसांडून नागरिकांना मारहाण, गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 9, 2020, 11:08 AM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील आदमपूर परिसरातील खतगाव, मुतन्याळ, केसराळी, हिप्परगा, बडूर या गावांमध्य तोतया पोलिसांनी धुमाकुळ घातला. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी पोलीस असल्याची बतावणी करून तुम्ही कोरोना लॉकडाऊनमध्ये का बाहेर आलात असे विचारत दुकानदार व शेतकऱ्यांना अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणानंतर आदमपूर परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मारुती स्वीफ्ट डिझायर क्रमांक एमएच ०३ सी बी - ०००२ या वाहनांतून चार तोतया पोलीस आदमपूर येथे आले. आम्ही पोलीस आहोत, कोरोना लॉकडाऊन काळात किराणा दुकान का चालू ठेवलात म्हणून दुकानदार व दोन-तीन ग्राहकांना अमानुषपणे मारहाण केली. दुकानदाराकडून दंड भर म्हणून पैशाची मागणी केली, तेव्हा दुकानदाराने भीतीपोटी त्यास पाचशे रुपये देऊन दुकान बंद केले. या तोतया पोलिसांनी आदमपूर व परिसरातील अनेक गावांमध्येही ५ एप्रिल रोजी असाच धुमाकूळ घातला. सरपंच व पोलीस पाटील यांना समजल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना हे चारही तोतया पोलीस पुन्हा याच भागात आले. त्यांनी पुन्हा ग्रामस्थ, दुकानदार व शेतकऱ्यांना मारहाण सुरू केली. हा प्रकार अनेकांनी पाहिला आणि त्या तोतया पोलिसांकडे ओळखपत्राची मागणी केली असता ते खतगाव मार्गे पळून गेले. काही गावकऱ्यांनी त्यांचा पाठलागही केला परंतु त्यांनी त्यांच्या दुचाकीवर कार घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आदमपूरमधील काही जणांनी रामतीर्थ पोलिसांत लेखी तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी या चारही आरोपींचा शोध लावला आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.