ETV Bharat / state

नांदेडमध्ये लोणे परिवाराकडून गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांचे रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य कामगार नागरिकांना जीवनातील कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी जोपासून प्रमोद लोणे, लहानकर परिवाराच्यावतीने ओंकारेश्वरनगर, प्रेमनगर व जैन मंदीर परिसरातील २०० कुटुंबियांना एक महिना पुरेल इतके जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Essential things distribution to 200 families in nanded
लोणे परिवाराकडून गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप
author img

By

Published : Jun 2, 2020, 6:49 PM IST

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे लहानकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून २०० गोरगरीब कुटुंबियांना जीवनाश्यक वस्तू व सर्व धान्य किटसचे वाटप केले. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांचे रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य कामगार नागरिकांना जीवनातील कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी जोपासून प्रमोद लोणे, लहानकर परिवाराच्यावतीने ओंकारेश्वरनगर, प्रेमनगर व जैन मंदीर परिसरातील २०० कुटुंबियांना एक महिना पुरेल इतके जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात गहू, तांदूळ, साखर, दाळ, तिखट आदींचा समावेश आहे.

याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर ढोले, माजी सरपंच बालाजी कुऱ्हाडे, शिक्षक व कर्मचारी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, ज्येष्ठ संगितकार तथा पत्रकार सदाशिव गच्चे, प्रणिता प्रमोद लोणे, लहानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दानशूर व्यक्तींनी गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे यावे -

कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच संकटात आले आहे. हे सकंटही एक दिवस जाणारच आहे.आपण त्याला संपवू यासाठी शासन, प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, संकटाची व्याप्ती मोठी आहे. अनेक लोक बेरोजगार झाल्यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. प्रशासन सर्व प्रयत्न करत आहेच. मात्र, कोरोना पासुन संरक्षण करताना एकही भूकबळी जावू नये, यासाठी समाजातील प्रत्येक दानशूर व्यक्तींनीही स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

ते म्हणाले, नांदेड शहरातील नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता, शारिरीक आंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा, मॉस्कचा नियमित वापर करा. मात्र, सामाजिक दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. यावेळी त्यांनी लोणे परिवाराचे विशेष कौतुकही केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.