ETV Bharat / state

अंत्यविधीसाठी लाकडांची मागणी वाढली; लाकडाला पर्याय शोधण्याची प्रशासनाकडे मागणी - नांदेड कोरोना

नांदेडात सध्या अंत्यविधीसाठी लाकडांच्या मागणीत सहा पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी इतर पर्याय शोधण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली जात आहे.

नांदेडात अंत्यविधीसाठी लाकडांची मागणी वाढली

author img

By

Published : May 9, 2021, 12:35 PM IST

Updated : May 9, 2021, 12:40 PM IST

नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच अंत्यविधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत आहेत. नांदेडात सध्या अंत्यविधीसाठी लाकडांच्या मागणीत सहा पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी इतर पर्याय शोधण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली जात आहे.

नांदेडात अंत्यविधीसाठी लाकडांची मागणी वाढली

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रौद्ररूप
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत कोरोने आपलं रौद्र रूप धारण केलं आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील लाखो लोक बाधित झाले आहेत. तर दोन लाखांच्या वर मृत्यूचा आकडा पोहचला आहे. यामुळे स्मशानभूमीत देखील रांगा लावण्याची वेळ आली होती. नांदेडात आता कोरोना रूग्णांची संख्या किंचीत कमी झाले असला तरी मृत्यूचा आकडा फारसा कमी झाला नाहीये. नांदेडात अजूनही करोना बाधित रूग्णांचा आकडा जवळपास ५०० इतका आहे तर मृत्यूंची संख्या १५ इतकी आहे. त्यातच आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड
दुसऱ्या लाटेत कोरोना बधितांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. जिल्हाभरात जवळपास दीड हजारावर मृत्यू झाले आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत आहेत. कोरोना महामारीपूर्वी शांतीधाम स्मशानभूमीत दर महिन्याला ११० च्या आसपास अंत्यसंस्कार व्हायचे. यावेळी ५० टनच्या आसपास लाकडं लागायची. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा आकडा वाढला आहे. एप्रिल महिन्यात जवळपास ७०० अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यासाठी २८० टनच्या आसपास लाकडे लागली आहे. एका पार्थिवाला जळण्यासाठी 4 क्विंटल लाकूड लागतो अशी माहिती शांतिधाम सेवा प्रतिष्ठानचे सदस्य नरसिंग गायकवाड यांनी दिली आहे.

अंत्यसंस्कारासाठी इतर पर्याय शोधण्याची मागणी
अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे, अंत्यविधीसाठी मोठा कालावधी देखील लागत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि अंत्यविधीचा वेळ बचत करण्यासाठी गॅस दाहिनी किंवा विद्युत दाहिनीचा वापर करण्याची मागणी शांतिधाम सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी हर्षद शहा यांनी केली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आढावा
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 82 हजार 117
निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 87 हजार 460
कोरोना बाधित एकूण व्यक्ती- 84 हजार 624
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 76 हजार 944
मृत्यू संख्या-1 हजार 696
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.92 टक्के
शनिवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21
शनिवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-64
शनिवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-381
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 691
शनिवारी अतिगंभीर प्रकृती असलेले-184

Last Updated : May 9, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.