ETV Bharat / state

CORONA : न्यूज वाहिनीचा लोगो वापरून कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध नांदेडमध्ये गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 18, 2020, 11:02 AM IST

राज्यासह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असताना कोरोना संदर्भात अफवा पसरवल्या जार आहेत. असाच खोटा मेसेज समाज माध्यमावर टाकणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nanded
CORONA : कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्या अज्ञाता विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल

नांदेड - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन विविध उपायजयोजना करत आहे. परंतू समाज माध्यमांवर खोटी माहिती पसरवून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवले जात आहे. एका मराठी न्युज वाहिनीच्या स्क्रीनच्या लोगोचे फोटोशॉपद्वारे खोटा मेसेज तयार करणाऱ्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - नांदेड : विमानतळावरच प्रवाशांची तपासणी, विदेशातून आलेल्यांच्या हातावर शिक्के

शहरातील सिडको भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, अशा मथळ्याखाली खोटा मेसेज तयार करून समाज माध्यमांवर टाकण्यात आला होता. सोमवारी (दि. 17 मार्च) ही बाब समोर आल्यानंतर या वाहिनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. राज्यासह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असताना कोरोना संदर्भात अफवा पसरवल्या जार आहेत. असाच खोटा मेसेज समाज माध्यमावर टाकणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाविषयी कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणारे मेसेज समाज माध्यमांवर टाकू नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.