ETV Bharat / state

पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तृणमूल काँग्रेसने विजय मिळविल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप करत नांदेड भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षांचा निषेध व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

author img

By

Published : May 5, 2021, 8:05 PM IST

BJP Nanded opposes Bengal violence
बंगाल हिंसा विरोध भाजप आंदोलन नांदेड

नांदेड - पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तृणमूल काँग्रेसने विजय मिळविल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप करत नांदेड भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षांचा निषेध व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

प्रतिक्रिया देताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

हेही वाचा - नांदेड : प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार

नांदेडमध्ये केला निषेध..!

पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यश मिळविले. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. परंतु, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडला असून भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, बिजय गंभीरे, अ‌ॅड. दिलीप ठाकूर, व्यंकटराव मोकले यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अराजकता माजवून सत्तेचा माज दाखवू नका - चिखलीकर

पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेसने विजयानंतर सत्ता स्थापन होण्यापूर्वीच सत्तेचा गैरवापर करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचा प्रकार सुरू केला आहे. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, यात तृणमूल ने विजय मिळविलेला आहे. याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदनही केले. निवडणुकीत जय-पराजय मिळत असते. पराजय म्हणून निराश व्हायचे नसते. तसेच, विजय झाल्यानंतर उन्माद माजवायचा नसतो, परंतु तृणमूल पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजप कार्यकर्त्यांचे खून, तर महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील एकही मंत्री व पदाधिकारी यावर भाष्य करत नाही व निषेध सुद्धा केलला नाही. याचाच अर्थ या हल्ल्यांना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची मूक संमती आहे, हे सिद्ध होते. कारण निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या रिक्षा सरकारचे सर्व मंत्री व पदाधिकारी, नेते मंडळी यांनी तर ममता दीदी वाघीण म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला होता आणि आता तीच ममता दीदी क्रूर बनली तर एकही जण बोलण्यास तयार नाही, असे का? पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे नांदेड महानगर भाजपचे सर्व पदाधिकारी ठामपणे उभे असून या हल्ल्याच्या, तसेच याबाबत मूग गिळून गूपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी 'तिघाडी सरकारच्या' तीनही पक्षांचा बंगाल सरकार समवेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासावी- कुलपती भगत सिंह कोश्यारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.