नांदेड- शहरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी एका आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के एन. गौतम यांनी सुनावली आहे. नांदेड शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक शुभम खंडागळे (वय २६ रा. कल्याण नगर नांदेड) याने २६ मार्च २०१८ ला साथीदाराच्या मदतीने अत्याचार केला होता.
हेही वाचा- भिवंडीत अग्नीतांडव सुरूच; सायजींग-डाईंग कारखान्याला भीषण आग
याप्रकरणी भाग्यनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक शरद मरे यांनी केला. या प्रकरणात ११ साक्षी तपासून आरोपी शुभमला दोषी ठरविण्यात आले. न्यायमूर्ती के.एन. गौतम यांनी शुभमला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एम.ए. बत्तुला डांगे यांनी काम पाहिले.