नांदेड - जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 66 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47, अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 19 जण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे, 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
देशमुख कॉलनी नांदेड येथील 65 वर्षीय महिला आणि परभणी जिल्ह्यातील मानवत येथील 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांवर अनुक्रमे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्त व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. यात 39 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 7 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.
रविवारच्या एकूण 478 अहवालापैकी 402 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 935 वर पोहोचली आहे. यातील 500 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 389 बाधितांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 31 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे.
रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 24 रुग्णांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 6, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 3, जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील 2, पंजाब कोविड केअर सेंटर येथील 13 जणांचा समावेश आहे.
नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये -
एसजीजीएस एअरपोर्ट नांदेड येथील 1 व्यक्ती, श्रीनगर नांदेड येथील 2, सराफा चौक येथील 1, पिरबुऱ्हानगर येथील 1, सोमेश कॉलनी नांदेड येथील 11, विष्णुनगर येथील 1, शहिदपुरा येथील 2, जुनामोंढा येथील 2, खालसा कॉलनी येथील 1, पाठक गल्ली सराफा येथील 2, देगलूरनाका येथील 1, मालवतकर कॉलनी जुना कौठा येथील 1, मिलगेट येथील 1, विसावानगर येथील 1, विष्णु कॉम्पलेक्स व्हिआयपी रोड येथील 1, शहिदपुरा येथील 3, बळीराम येथील 2, गाडीपुरा येथील 1, गोविंदनगर येथील 1, विष्णुपूरी 1, गाडीपुरा येथील 2, विष्णुपुरी जि.एम.सी. परिसर येथील 1, बिलोली तालुक्यातील कोल्हेबोर गाव येथील 1, मुखेड तालुक्यातील खैरका येथील 2, रावी तालुक्यातील मुखेड येथील 1, मानसपुरी कंधार येथील 1, फुलवळ कंधार येथील 8, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 2, हिंगोली श्रीनगर येथील 1, आंबेडकरनगर नांदेड येथील 1, विष्णुनगर नांदेड येथील 3, गाडीपुरा नांदेड येथील 1, साईनगर इतवारा नांदेड येथील 2, पांडुरंगनगर येथील 1, परभणी जिल्ह्यातील श्रीकृष्ण गंगाखेड येथील 2 व्यक्ती , या रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 389 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 77, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 144, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, जिल्हा रुग्णालय येथे 24, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 17, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालय 42, 7 बाधित हे औरंगाबाद येथे तर 1 बाधित निजामाबाद येथे 1 संदर्भित झाले आहेत.
कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
- घेतलेले स्वॅब- 10 हजार 102
- निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 275
- रविवार पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 66
- एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 935
- रविवार स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 5
- रविवार स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - निरंक
- मृत्यू संख्या - 46
- रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 500
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 389
- प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 208