नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 150 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 92 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या निदानासाठी 1 हजार 318 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 24 हजार 309 वर पोहोचला आहे. त्यापैकी 22 हजार 704 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 785 कोरोनाबाधितांवर उपचास सुरू असून, त्यातील 23 जणांची प्रकृती गंभीर आहे.
देगलूर येथील महिलेचा मृत्यू
शनिवार 6 मार्च 2021 रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील 65 वर्षांच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 605 जणांना आपला जीव गमावा लागला आहे.
जिल्ह्यात 785 कोरोना रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात सध्या 785 रुग्ण सक्रिय आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 47, किनवट कोविड रुग्णालयात 34, मुखेड कोविड रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर 59, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपांतर्गत गृहविलगीकरण 282, तालुकांतर्गत गृह विलगीकरण 147 तर खासगी रुग्णालयामध्ये 89 रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी
एकूण घेतलेले स्वॅब- 2 लाख 38 हजार 704
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 10 हजार 77
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 309
एकूण कोरोनावर मात केलेल्यांची संख्या - 22 हजार 704
एकूण मृत्यू संख्या- 605