ETV Bharat / state

नवीन तीन बाधितांचे १३ निकटवर्तीय अलगीकरणात; तपासणीसाठी स्वॅब घेणार

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

author img

By

Published : May 1, 2020, 8:04 PM IST

नांदेड - सांगवी येथील रुग्णांच्या 4 निकटवर्तीय व्यक्तींना यात्री निवास येथील कोव्हिड केअर सेंटर येथे तर किवळा ता.लोहा येथील रुग्णाचे एकूण ९ निकटवर्तीय व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर ता. लोहा आणि कंधार येथे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांची स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले. पिरबुरहान नगर ता. नांदेड आणि सेलू ता. परभणी येथील महिला रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर दोन्ही रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित 4 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

१) अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल हा दि. 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येऊन तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

२) श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहनचालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. सदर वाहन चालक आणि मदतनीस हे दि. 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन दि. 28 एप्रिल रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सीमेवरच त्यांना अडवून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. सदर 3 व्यक्तींचे 29 एप्रिल रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत सदर रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा शल्यचिकित्सक

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

समन्वय अधिकारी व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार:

• आतापर्यंत एकूण संशयित - 1203
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या -1036
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 342
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 167
• पैकी रुग्णालयात क्वारंटाईन - 116
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -920
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 103
• एकूण नमुने तपासणी- 1088
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 6
• पैकी निगेटिव्ह -969
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 103
• नाकारण्यात आलेले नमुने - 5
• अनिर्णित अहवाल – 4
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 2

जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 84 हजार 23 आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.