ETV Bharat / state

महिलेचा पोलीस शिपायावर अत्याचाराचा आरोप; नागपुरातील प्रकार

author img

By

Published : Oct 1, 2020, 10:02 PM IST

गेल्या काही दिवसात तर आरोपी पोलीस वारंवार सुदामनगरी परिसरात पीडित महिलेच्या घरी येऊन चित्रफीतची धमकी देऊन शारीरिक शोषण करायचा. आरोपीकडून ब्लॅकमेलिंग आणि शोषणाचा त्रास वाढल्यामुळे पीडितेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

nagpur police
नागपूर पोलीस

नागपूर - येथील एका 33 वर्षीय महिलेने पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. विक्रमसिंह बनाफर असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

महिलेने केला पोलीस शिपायावर बलात्काराचा आरोप; नागपुरातील प्रकार

पीडित महिलेची तक्रार आहे, की विक्रमसिंह बनाफर सोबत तिची ओळख होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आरोपीने तिला बेलतरोडी भागात मित्राच्या फ्लॅटमध्ये नेऊन गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्यावेळची चित्रफीत मोबाईलमध्ये बनविली होती. पीडितेची तक्रार आहे, की त्याच चित्रफितच्या आधारे आरोपीने तिला ब्लॅकमेल करणे, धमकावणे सुरू केले होते.

गेल्या काही दिवसात तर आरोपी पोलीस वारंवार सुदामनगरी परिसरात पीडित महिलेच्या घरी येऊन चित्रफीतची धमकी देऊन शारीरिक शोषण करायचा. आरोपीकडून ब्लॅकमेलिंग आणि शोषणाचा त्रास वाढल्यामुळे पीडितेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला बलात्कार आणि अनुसूचित जाती प्रतिबंधक (अ‌ॅट्रोसिटी) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, एका बाजूला देशात हाथरस आणि इतर ठिकाणी तरुणींवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण गाजत असतानाच नागपूरमध्ये हे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.