नागपूर Woman Body Found : समृद्धी महामार्गाच्या बाजूला गुमगाव-वडगाव हा छोटा रस्ता आहे. या रस्त्याच्या लगत वडगाव शिवारात गुमगावचे शेतकरी आष्टणकर आणि मातीखाये यांच्या शेताच्या सीमेवर काल दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह शेतात काम करणाऱ्या मजुरांना दिसला. त्यानंतर लगेचचं या संदर्भात माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे, पोलीस निरीक्षक गोकुल महाजन घटनास्थळी दाखल झाले. (Woman Murder Case Nagpur)
जीवे मारून शेतात फेकले : मयत महिलेचं वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले आहेत. महिलेची हत्या याच ठिकाणी झाली असावी किंवा तिला मारून इथे फेकून देण्यात आलं असावं अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल पोलीस अद्याप काही बोलले नाहीत; मात्र ती गुमगाव किंवा वडगाव येथील रहिवासी नसल्याचं समोर येत आहे. घटनास्थळी डीसीपी अर्चित चांडक, एसीपी शरद कदम हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे. पोलीस महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना नंदुरबार शहरानजीक असलेल्या नारायणपूरला 27 ऑगस्ट, 2021 रोजी घडली होती. येथे रस्त्यावर एका अनोळखी तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले होते. या तरुणीचे शिर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होऊन परिसराची झाडाझडती घेतली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मृत तरुणी कोण, याचा पोलीस शोध घेत आहेत.
श्वानपथकाची पाहणी: अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, मृत तरुणी कोण आहे आणि तिचा घातपात झाला आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरानजीक तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्यानं तर्कवितर्क लावण्यात येत होते.
हेही वाचा: