नागपूर - आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधानपरिषदेच्या कामाला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. त्यातच सभागृहात पहिले कोण बोलणार? यावरून गोंधळ सुरू झाला. तसेच विधेयकांवर देखील गोंधळामध्येच चर्चा झाली. या सभागृहात देखील राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्या आहेत. विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे आज सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहातील घडामोडी -
- दु. 1.22 - सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- दु. 1.13 - विरोधकांचा गदारोळ, निरंजन डावखरे, गिरिश व्यास, अनिले सोले, रंजित पाटील, सुजतसिंह ठाकूर या सद्स्यांना सभापतींनी सुनावले.
- दु. 1.07 - कामकाज सुरू
- दु. 12.50 - विधानपरिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित
- दु. 12.48 - राष्ट्रपतीचे अभिभाषण आणि लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्या. लक्षवेधी सूचना उद्या सकाळी १० वाजता होणार
- दु. 12.45 - कामकाज सुरू
- दु. .12. 38 - कामकाज तहकूब
- दु. 12.04 - सभागृहात पाहिले कोण बोलणार यावरून गोंधळ सुरू
- दु. 12.04 - 289 ने चर्चा होऊ देणार पण जास्त लोक बोलू नये - सभापती
- दु. 12.00 - विधानपरिषदेचे कामकाज सुरू