ETV Bharat / state

Wadettiwar On OBC Certificate : २८ लाख मराठ्यांना ओबीसीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली; वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट - मराठ्यांना ओबीसीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली

Wadettiwar On OBC Certificate : पैसे घेऊन तब्बल २८ लाख मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसी समाजाचे प्रमाणपत्र (Allotment of OBC Certificates to Maratha) वाटण्यात येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. ते आज (शनिवारी) नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते. (Wadettiwar alleges against state govt)

Wadettiwar On OBC Certificate
वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 3:46 PM IST

मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप करताना विजय वडेट्टीवार

नागपूर Wadettiwar On OBC Certificate : सरकारने दिलेल्या तोंडी आश्वासनावर ओबीसी नेते कसे समाधानी झाले. मराठा समाजातील लोकांना ओबीसींचे प्रमाणपत्र देणार नाही असं सरकार म्हणत असलं तरीही राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे मराठा असताना त्यांनी ओबीसींचं प्रमाणपत्र मिळवलं आहे. एवढचं नाही तर 'कास्ट व्हॅलिडीटी'ही झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पैसे घेऊन प्रमाणपत्र देण्याचं काम अगदी झपाट्यानं सुरू आल्याचा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला आहे. वेळप्रसंगी यासंदर्भात आणखी गौप्यस्फोट केले जातील असं देखील ते म्हणाले.

बोगस ओबीसींना शोधा : राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस ओबीसी आहेत. नोकऱ्या बळकावणाऱ्यांवर कारवाई करा. जातीनिहाय जनगणना करा, २८ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. मागील दोन वर्षांत हे काम झपाट्यानं झालं आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. बोगस प्रमाणपत्र कोणाला दिलं, 'एसआयटी' चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे.

ओबीसी समाजाच्या तोंडी पानं पुसली : ओबीसी समाजाच्या मागण्या जर तोंडीचं मान्य करायच्या होत्या तर मग बैठक कशाला घेतली? हा फार्स होता का, असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. सरकारने ओबीसी समाजाला तोंडी आश्वासन देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री, मंत्री कंत्राटी पद्धतीने भरले जातील : जळगावात कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांचे पद भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. चपराशी पासून इंजिनिअर पर्यंत संपूर्ण जागा कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत. आज यांनी तहसीलदार पदाची जाहिरात काढली आहे. उद्या कंत्राटी पद्धतीनं मुख्यमंत्री पद भरण्याची वेळ यांच्यावर येऊ नये, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. ६ महिने मुख्यमंत्री, ३ महिने उपमुख्यमंत्री राहतील अशी जाहिरात काढली जाईल असं ते म्हणाले आहेत.

यात काही नवल नाही : भाजपा सोबत सत्तेत असणारे पक्ष हे निवडणूक आयोग खिशात घेऊन फिरत आहेत. दोन लोक जरी भाजपा बरोबर गेले तरी पक्ष आणि चिन्हाचा दावा केला तरी त्यात नवल वाटू नये, असं देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत : एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या १६ आमदारांना जीवनदान देण्याचं काम सुरू आहे. म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. Rahul Narvekar Foreign Tour : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांची परदेशवारी रद्द, ठाकरे गटाची 'ती' चाल यशस्वी?
  2. Maratha Reservation Row : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आजपासून मराठा आरक्षण संवाद दौऱ्यास सुरुवात
  3. Lok Sabha Election 2024 : ना पोस्टर ना बॅनर, मतदारांना चहाही पाजणार नाही; नितीन गडकरींनी केलं जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.