ETV Bharat / state

रामल्लाच्या प्रसादासाठी सर्वात मोठी ‘हनुमान कढई' तयार; नागपूरच्या कारागिरांची मेहनत रामचरणी जाणार - Ayodhya

Ayodhya Hanuman Kadai : १५ हजार किलो अन्न शिजविले जाईल इतक्या क्षमतेची जगातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झालीय. ही कढई आता अयोध्येला जाण्यास सज्ज झालीय. नागपुरातील नागेंद्र विश्वकर्मा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ही कढई तयार केली आहे. या कढईला "हनुमान कढई' असं नाव देण्यात आलंय. शेफ विष्णू मनोहर या कढईत अयोध्येत प्रसाद तयार करतील.

Ayodhya Hanuman Kadai
रामल्लासाठी हनुमान कढई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 5:17 PM IST

Updated : Jan 17, 2024, 8:03 PM IST

नागपूर Ayodhya Hanuman Kadai : रामनगरी अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी श्रीरामाचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळं देशात सर्वत्र वातावरण भक्तीमय झाल्याचं पाहायला मिळतंय. यातच नागपुरात जगातील सर्वात मोठी कढई तयार करण्यात आली आहे. नागपूरच्या कारागिरांनी ही कढई तयार केली आहे. ही 'हनुमान कढई' १५ हजार लिटर क्षमतेची आहे. कढाईचं वजन २ हजार किलो इतकं आहे. त्यात १५ हजार किलो अन्न शिजविले जाऊ शकते. या कढईत ७ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करण्‍यात येणार आहे.

हनुमान कढईचे वैशिष्ट्य : हनुमान कढईची क्षमता 15 हजार लिटर असून तिचे वजन दोन हजार किलो आहे. या कढईचा व्यास १६ फूट आहे. कढई तयार करण्यासाठी ६ मिमी आकाराची जाड स्टील शीट वापरण्यात आली आहे. इतक्या जाड्या स्टीलचा उपयोग धरणाचे गेट किंवा जहाज बांधण्यासाठी केला जातो. हनुमान कढईचा पृष्ठभाग लोखंड आणि तांब्याचा आहे. ही विशाल कढई तयार करण्यासाठी सुमारे एक महिना लागला. परंतु, येथील कारागीर विश्वकर्मा पिता-पुत्र आणि त्यांच्या इतर कारागिरांच्या कौशल्य, मेहनत आणि समर्पणामुळं हे काम आठवडाभरात पूर्ण झालं आहे.

२२ जानेवारीला तयार करणार राम शिरा : शेफ विष्णू मनोहर २२ तारखेला जगदंबा संस्थान कोराडी येथे ६ हजार किलोचा राम शिरा तयार करणार आहेत. त्यानंतर २६ जानेवारीला अयोध्येत ७ हजार किलोचा 'राम शिरा’ केला जाईल. त्याचबरोबर विष्णू मनोहर २ नव्या विश्वविक्रमांना गवसणी घालणार आहेत. त्यानंतर ही विशाल हनुमान कढई अयोध्येतील श्री राम मंदिराला अर्पण करण्यात येणार आहे, असं मनोहन यांनी स्पष्ट केलं.

विश्वविक्रमी विष्णू मनोहर यांचं रेकॉर्ड : शेफ विष्णू मनोहर यांनी याआधी अनेक रेकॉर्ड केले आहेत. गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी अडीच हजार (२५००) किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात ७ हजार किलोची महामिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. तसेच २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर ५००० किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

हेही वाचा -

  1. नागपुरात 'एक धागा रामासाठी' उपक्रम; विणकरांनी घेतला पुढाकार
  2. सर्वत्र राम भक्तीची लाट; ठाण्यात राम मंदिर प्रतिकृती आणि झेंडयांना प्रचंड मागणी
  3. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची अनोखी भक्ती; श्रीराम प्रभूंच्या स्वागतासाठी केला 11 तास राम जप

Last Updated : Jan 17, 2024, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.