नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी (Nitin Gadkari News) वर्षांचा उद्घाटन समारोह नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरएसएसचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी त्यांच्या विद्यार्थीदशेतल्या आठवणींना उजाळा दिला. एका स्कूटरवर चार-चार कार्यकर्ते बसवून वाहतुकीचे नियम ते कसे मोडायचे याचा किस्सा सांगितला. यासोबतच विद्यापीठात केलेली तोडफोड, कुलगुरूसोबतचा वाद यावेळी गडकरींनी सांगितला. (Nagpur News)
कठीण परिस्थितीतून पुढे आलो : मी कोणी समोरच्या बेंचवर बसणारा नव्हतो. विद्यार्थी परिषदेत काही शांत स्वभावाचे लोक राहत होते. आम्ही मात्र दुसऱ्या प्रकारचे होतो. मी विद्यार्थी नेता होतो, दत्ताजी आमच्यासाठी एक मात्र आधार होते. मी विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी अतिशय कठीण परिस्थिती होती.
वाहतुकीच्या नियमाबाबत सांगितला किस्सा - एक हरी रेडी नावाचे आमचे कार्यकर्ते होते. त्यांच्याजवळ एक विजय स्कूटर होती. स्कूटरवर एकावेळी दोघांनाच बसता येते. मात्र, चार- चार, पाच- पाच लोकांना न्यावे लागायचे. अशावेळी मी स्कूटर चालवायच आणि चौथा जो बसेल तो नंबर प्लेटवर हात ठेवायचा. दत्ताजींकडून पेट्रोलसाठी दहा- वीस रुपये घेऊन आम्ही निघायचो आणि पेट्रोल टाकून गाडीही चालायची. तर कुठल्याही चौकात आम्ही थांबायचे नाही, शेवटचा बसणारा व्यक्ती नंबर प्लेटवर हात ठेवायचा, कारण पोलिसांनी मग कितीही शिट्टी वाजवली तर आमची गाडी पुढे निघून जायची, असा किस्साच गडकरींनी सांगितला. ( Broke Traffic Rules In Student life)
हेही वाचा -
- Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; खटला मुंबईला स्थलांतरित करण्यासाठी एनआयएची उच्च न्यायालयात धाव
- Nitin Gadkari News: निवडणूक जिंकण्यासाठी किलोभर सावजी मटण घरोघरी पोहचवले तरीही हरलो - नितीन गडकरी
- Prithviraj Chavan On Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावावर भाजपमध्ये एकमत नाही- पृथ्वीराज चव्हाण