ETV Bharat / state

गणेशोत्सवादरम्यान नागपुरात कोणतेही निर्बंध नाही; पालकमंत्री राऊतांचे स्पष्टीकरण - नागपूर कोरोना निर्बंध बातमी

सणासुदीला निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. पण ही संख्या पुन्हा घटल्याने बाप्पाच्या आगमनासह निर्बंधांचे संकट तूर्तास टळले आहे.

nagpur
nagpur
author img

By

Published : Sep 13, 2021, 7:07 AM IST

नागपूर - जिल्ह्यात मध्यंतरी पाच दिवस सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णसंख्या वाढून दोन आकडी झाली होती. त्यामुळे निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. पण ही संख्या पुन्हा घटल्याने बाप्पाच्या आगमनासह निर्बंधांचे संकट तूर्तास टळले आहे. त्यामुळे नागपूरकर आणि व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया

व्यापारी वर्गात पुन्हा भीतीचे वातावरण -

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पाच दिवस कोरोनाचे रुग्ण वाढले होते. यामुळे रुग्णसंख्या जर दोन आकडी जाणार असेल आणि सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्बंध लावावे लागतील, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय कार्यालयातील बैठकीनंतर दिले होते. शिवाय तीन दिवसांत निर्बंध लावले जाईल, असेही सांगितले होते. यामुळे व्यापारी वर्गात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्हिडीओमधून नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे, असे म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी नागपूरच्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा -

कोरोनानिर्बंध पुन्हा लावणार असल्याच्या बातम्यांनी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी निर्बंध लावण्यास विरोध केला होता. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली होती. यामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली की, जिल्हाधिकारी विमला आर यांनी व्यापारी वर्गाशी चर्चा केली आहे. यासोबत टास्क फोर्स यांच्याशी चर्चेनंतर तूर्तास निर्बंध न लागण्याचे संकेत मिळाले आहे. दरम्यान, व्हिडीओच्या माध्यमातून गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या असून यात नागरिकांनी मात्र कोरोना नियमाचे पालन करून गणेशोत्सव सजारा करण्याचे आवाहन पालकमंत्री राऊत यांनी केले.

हेही वाचा - अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, चार जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.