नागपूर: जे आम्ही भोगलेलं आहे, त्याचे घाव आजही ताजे आहेत, (The wounds of what we suffered are fresh) त्यामुळे हा चित्रपट बघण्याची आमच्यात हिम्मत शिल्लक नसल्याचे (so we don't have the courage to watch movies) मत काश्मीरचे विस्तापित व्यक्त करत आहेत, काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला तर ते घाव आणखी ताजे होतील म्हणून आम्ही अजून तरी चित्रपट बघितला नसल्याचे ते सांगतात. 1990 च्या दशकात काश्मिरी नागरिकांवर अमानवीय अत्याचार सुरू झाले होते. डोळ्यासमोर अनेकांचा जीव घेतला जात होता, तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने आम्हाला काश्मीर सारखे नंदनवन सोडावे लागल्याचे दुःख कायम असल्याचे ते सांगतात.
ज्यावेळी काश्मिरी हिंदूवर अत्याचार होत होते तेव्हा आमच्या बाजूने कुणीही उभे नव्हते, रोज नवी यादी जाहीर व्हायची,ज्यात अनेकांचे नावे असायची. ज्यांचे नाव जाहीर केले त्यांना तात्काळ काश्मीर सोडण्यास भाग पडले जात होते. ज्यांनी विरोध केला त्यांना मारले जात होते, ते सगळं आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो अशी भावना डॉ गंजू यांनी व्यक्त केली.