मुंबई : मुंबईमध्ये अडीच वर्षांनंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला होता. मात्र, या गणेशोत्सवाला गालबोट लावले गेले. यंदाही पहिल्याच दिवशी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Chintamani Ganeshotsav Mandal) गणेशाचे दर्शन घेण्यास आलेल्या एका भाविकाला मंडळाचे ४ ते ५ कार्यकर्ते बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला (beating Ganesha devotee at Chintamani Chinchpokli)होता. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर एका गणेश भक्ताला मारहाण करतानाचा सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओची राज्य मानवी हक्क आयोगाने दाखल घेतली. त्यानंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला (State Human Rights Commission took note of) आहे.
गणेशभक्ताला मारहाण : २०२२ च्या गणेशोत्सवदरम्यान ४ सप्टेंबरला चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ येथे प्रवेशद्वारावर एका गणेशभक्त तरुणाला काही इसमांनी मारहाण केल्याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला होता. त्यामध्ये काही अनोळखी इसम एका व्यक्तीस लाथा आणि हाताने मारहाण करीत असल्याचे दिसून आले (Ganesha devotee at Chintamani Chinchpokli) होते.
तक्रार दाखल : त्यानंतर या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सोमोटो केस दाखल करण्यात आली. आयोगाने या प्रकरणी मारहाण झालेला इसम आणि त्यास मारहाण करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचेवर निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेशित केले आहे. संबंधित मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेवूनही या व्यक्ती तसेच मारहाण करणारे इसम मिळूण आलेले (Beating Ganesha Devotee) नाहीत.
अदखलपात्र गुन्हा : या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. संबंधित न्यायालयाची तपासाकरीता परवानगी प्राप्त केलेली असून मारहाण झालेला इसम आणि त्यास मारहाण करणारे इसम मिळून येणे आवश्यक आहे. मुंबई पोलीस दलामार्फत सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, या घटनेतील मारहाण झालेला इसम व त्यास मारहाण करणारे इसम याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी काळाचौकी पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. २३७५४१२८, २३७५७३५७, २३७३५८०४ किंवा पोलीस निरीक्षक प्रविण कोईस्कर ९५९४९३३९०९ यांचेशी संपर्क करावा.