नागपूर: ललित पाटील माझ्या हाताला झटका देऊन पळाला. पण, तोच पोलीस लेमन ट्री परिसराच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडला आहे. (Sushma Andhare) त्या लेमन ट्रीमध्ये तो वास्तव्याला होता आणि त्याला तिथे बायका पुरवल्या जात होत्या, असा आरोप आमदार रवींद्र ढंगेकरांनी केला. त्या लेमन ट्री हॉटेलची कुठेही चौकशी झाली नाही; पण त्याचं हॉटेलमध्ये आज गृहमंत्र्यांची मीटिंग होत आहे. या योगायोगाच्या गोष्टी असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहे. (drug Smuggler)
'यांची' नार्को चाचणी करा: शंभूराज देसाई, दादा भुसे, ललित पाटील, भूषण पाटील, ससून हॉस्पिटलचे डीन संजय ठाकूर, त्यांचे स्वीय सहाय्यक उपचार करणारा डॉक्टर, हाताला झटका देऊन पळून गेला असं सांगणारा पोलीस आणि सोबतच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा रोजरी शाळेशी संबंधित असणारा विनय अरहना यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. जो ईडीच्या कारवाईनंतर तिथेच वॉर्ड नंबर 16 मध्ये होता त्याचा ड्रायव्हर दत्ता डाके याचीही नार्को टेस्ट केली जावी, असे त्या म्हणाल्या.
ललित पाटीलचा जयसिंघानिया केला जाईल का? पक्षीय राजकारण बाजूला ठेवा. हा तरुणाईच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. गेल्या १५ दिवसापासून फडणवीस का बोलत नव्हते. देवेंद्र फडणवीस का उत्तर देत नव्हते. कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहेत तरीही उत्तर का मिळत नाही. आमची वारंवार एकच शंका आहे की, ललित पाटीलचाही अनिल जयसिंघानिया केला जाईल का? जसा अनिल जयसिंघानियाला ताब्यात घेतला आणि सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात तशाच राहिल्या. तशाच इथेही गोष्टी गुलदस्त्यात राहतील का? सत्य काय ते एकदा बाहेर आलं पाहिजे. आम्ही तर देवेंद्र फडणवीसांकडे वारंवार मागणी करत आहोत की, याच्यातलं काहीतरी आम्हाला कळू द्या. कारण आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
उडता पंजाब अंतर्गत उडता पुणे: ड्रग्स मुक्त महाराष्ट्र हे व्हिजन आहे ही चांगली गोष्ट आहे, अभिनंदनीय आहे. पण, फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न साधा सरळ आहे की काय तुमच्या ड्रग्स मुक्त महाराष्ट्रमध्ये पुणे येत नाही का? उडता पंजाब सारखी जर उडता पुणे अशी जर अवस्था होत असेल तर काय बोलावं? पुणे एज्युकेशनल हब आहे. पूर्ण राज्यभरातून मुलं तिथे स्पर्धा परीक्षांसाठी येतात. त्या सर्व मुलांच्या भवितव्याचं आणि आरोग्याचं काय याचे उत्तर कोण देणार आहे. जर कोर्टाच्या परिसरातही चरस मिळत असेल तर हे किती धक्कादायक आणि चिंताजनक आहे. आपण ड्रग्समुक्त महाराष्ट्र करत असाल तर सोलापूर, नाशिक अशा ठिकाणी ड्रग्सचे कारखाने कसे काय दिसतात? असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला.
हेही वाचा: