ETV Bharat / state

महाल परिसरात शिवजयंती साजरी; शाळकरी मुलांचे शिवनाट्य ठरले आकर्षक

शिव जयंतीनिमित्त आज शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेकडून दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

shiv jayanti nagpur
नागपुरात शिवजयंतीचे साजरा होत असतानाचे दृश्य
author img

By

Published : Feb 19, 2020, 12:20 PM IST

नागपूर - संपूर्ण राज्यात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, राज्याच्या उपराजधानीत देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडत आहे. शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महाल परिसरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी शिवभक्तांची रिघ लागली होती. यावेळी ढोल-ताशा पथकांकडून महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली.

नागपुरात शिवजयंतीचे साजरा होत असतानाचे दृश्य

गेल्या अनेक वर्षांपासून महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रम साजरे केले जातात. आज शिव जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी या परिसरात नृत्य, पोवाडा आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत नाटक सादर केले. त्याचबरोबर, शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटने तर्फे दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा-माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; अनेक धक्कादायक खुलासे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.