ETV Bharat / state

अभिनेता संजय दत्तनी नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट - nagpur breaking news

नागपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांनी आज (दि. 5 जून) राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली.

भेटीवेळचे छायाचित्र
भेटीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:15 PM IST

नागपूर - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांनी आज (दि. 5 जून) राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट नागपूर येथील निवासस्थानी झाली. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा 21 फेब्रुवारी, 2021 रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस कुणालाही येणे शक्य झाले नव्हते. आज (दि. 5 जून) अचानक संजय दत्त यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षाला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या.

संजय दत्त यांच्या छोटेखानी भेटीत त्याने राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. संजय दत्त यांची नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. या संदर्भात कुणाल राऊत यांनी सोशल मीडियावर या सदिच्छा भेटीचे फोटो शेअर केले आहे.

हेही वाचा - ओलीस नाट्यामागील पटकथा : यूट्यूब आणि क्राइम शो बघून रचला कट मात्र पोलिसांपुढे आरोपीचा प्लॅन फेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.