नागपूर - कडाक्याचे ऊन आणि उकाड्याने वैतागलेल्या नागपूरकरांना आज कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. सुमारे अर्धा तास हा पाऊस बरसत होता. दरम्यान आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरकर पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर उकाड्यापासून थोड्या प्रमाणात का होईना सुटका झाली म्हणून समाधान दिसून आले. कारण, गेल्या 2 महिन्यांपासून सततचा उकाडा आणि घामाच्या धारा यांमुळे नागपूरकर त्रस्त झाले होते.
![Rain Before Mansoon comes chaitanya in surroundings](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3614744_nagpur22.jpg)
आज अनपेक्षितपणे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील दमटपणा काही प्रमाणात कमी झाला आहे. अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते ओले झाले होते. हा पाऊस मान्सूनपूर्व असला तरी पावसाचा वेग वाढावा आणि नागपूरकरांना उकाड्यापासून मुक्ती मिळावी, अशी अपेक्षा नागपूरकर करत आहेत.