ETV Bharat / state

..तर भारत 2030 पर्यंत मधुमेहाचे केंद्रस्थान असेल; तज्ज्ञांनी वर्तविली धोक्याची घंटा - भारतातील मधुमेह आजाराचे रुग्ण

वर्ष २०३० पर्यंत भारत मधुमेहाचे केंद्रस्थान बनेल, असे मत मधुमेह तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नागपुरात गेल्या वर्षात मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. शिवाय मधुमेह आजार टाळायचे असेल तर दैनंदिन व्यायाम, पौष्टिक आहार या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, असे मत मधुमेह तज्ज्ञ डॉ. हिमांशू पाटील यांनी व्यक्त केले.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Dec 8, 2020, 6:10 PM IST

नागपूर - भारतात 'मधुमेह' आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात विविध वयोगटांचा समावेश असून याच वाढत्या प्रमाणाच्या आधारे वर्ष २०३० पर्यंत भारत मधुमेहाचे केंद्रस्थान बनेल, असे मत मधुमेह तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नागपुरात गेल्या वर्षात मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. शिवाय मधुमेह आजार टाळायचे असेल तर दैनंदिन व्यायाम, पौष्टिक आहार या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, असे मत मधुमेह तज्ज्ञ डॉ. हिमांशू पाटील यांनी व्यक्त केले.

नागपूर

माणसाला दिवसेंदिवस विविध आजार जडत जात आहेत. याला कारणीभूत विविध बाबी आहेत. मधुमेह भारतात मागील काही काळापासून प्रचंड वाढत चालला आहे. या आजाराचे प्रमाण भारतातील बहुतांश व्यक्तींमध्ये आढळून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाट होत असल्याचे पहायला मिळत आहे.

मधुमेह आजाराचे दोन प्रकार -

तज्ज्ञांच्या मते मधुमेह आजाराचे दोन प्रकार आहेत. यात पहिला म्हणजे अनुवांशिक पद्धतीने आलेला आजार. जो लहान मुलांपासून ते वृध्द व्यक्तींमध्ये सामान्यतः आढळून येत आहे. दुसऱ्या प्रकारात व्यक्तीच्या दैनंदिन बाबींमध्ये झालेल्या बदलामुळे हा आजार वाढतो. येत्या काळात भारतात मधुमेह प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार, अशी शक्यता नागपूरचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. हिमांशू पाटील यांनी व्यक्त केली. शिवाय या आजाराचे स्वरूप पाहता ३० वयोगटापेक्षा अधिक असलेल्या नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

दैनंदिनबाबींकडे दुर्लक्ष हे कारण -

आजाराचा उगम हा आपल्या दैनंदिन क्रियेत, आहारात झालेल्या बदलात आहे. मधुमेह टाळायचा असेल तर प्रामुख्याने आहार, व्यायाम ह्या प्रमुख बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. मधुमेहापासून बऱ्याच प्रमाणात स्वतःला वाचविता येऊ शकते. मधुमेह रुग्णांची वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.