नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार ( opposition leader Ajit Pawar ) म्हणाले, की जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे झाली पाहिजे. त्यासाठी आजच्या कामकाजात सहभागी होणार नाही. कर्नाटक सरकार नवीन ठराव घेत आहे, सीमावर्ती भागातील लोक नाराज झाले आहे. सोमवारी ठराव घ्या,आमचे समर्थन राहील. लोकशाही पध्दतीने कामकाज करताना शेम शेम शब्द प्रयोग होतो. तसा अर्थ तोच होतो. जयंत पाटील यांनी निर्लज्ज हा शब्द प्रयोग सरकारसाठी होता, मात्र, त्यांना अडकवण्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( NCP leader Jitendra Awhad on boycott ) म्हणाले, की काल ठाण्यात आंदोलन झाले. मुख्यमंत्री विरोधात घोषणा दिल्यामुळे 8 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आम्ही अटकेला घाबरत नाहीत. तुम्ही भूखंडाचे श्रीखंड खायचे. तुम्ही भ्रष्टाचार करायचं आणि आम्ही बोलायचं नाही, असे होणार नाही. माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की कुठेही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. कुठेही शेतकऱ्यांना मदत केली नाही. फक्त घोषणा झाल्या आहेत. महाराष्ट्रातून निघून गेलेल्या प्रकल्पावर मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताधारी गोंधळ घालत राहिले, असा त्यांनी आरोप केला.