नागपूर - कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी 7 हजार 496 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तसेच आज 89 जण कोरोनामुळे दगावले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखाच्या पार गेला आहे.
आज 89 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू -
आज नागपूर जिल्ह्यात 24 हजार 418 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 7 हजार 496 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागातील 4422 तर ग्रामीण भागातील 3067 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज 89 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागातील 49 तर ग्रामीण भागातील 33 जणांचा समावेश आहे. तर जिल्हाबाहेरील 7 जणांच्या मृत्यूचीदेखील नोंद झाली आहे. यासोबतच आज 6 हजार 984 जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरमध्ये 77 हजार 627 सक्रिय रुग्ण आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा 4 लाख 99 एवढ झाला आहे. यापैकी 3 लाख 16 हजार 399 जण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, गुरूवारी पूर्व विदर्भात 12 हजार 971 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 हजार 116 जणा कोरोना मुक्त झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मिळून 172 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - रूग्णालये ही 'लाक्षागृहे' होत चाललीयत का? - मुंबई उच्च न्यायालय